पुणे जिल्हा : सुनेत्रा पवार यांच्या निवडीने जल्लोष

फटाक्याची आतषबाजी : गुलालाची उधळण
बारामती – राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोेर्तब होताच बारामती शहरात गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतषबाजी कार्यकर्त्यांचा जल्लोष केला.
नुकत्याच झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर बारामती मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटात निरुउत्साहाचे वातावरण होते. सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल होताच बारामतीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला.
भिगवण चौकात फटाके फोडत गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालची उधळण करीत एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष जय पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमानी, माजी नगरसेवक अभिजीत जाधव, माजी नगरसेवक नवनाथ बल्लाळ, शहर युवक अध्यक्ष अविनाश बांदल, अभिजीत काळे, नवनाथ मलगुंडे, प्रताप पागळे, विशाल जाधव, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
गेली २० वर्ष सुनेत्रा पवार या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. काटेवाडी निर्मलग्राम करण्यापासून त्यांनी सुरवात केली. एन्वहायर्मेंटल फोरमच्या माध्यमातून ओढा खोलीकरण, मोतीबिंदू, शस्त्रक्रिया शिबीर, वृक्षारोपण, कर्कराेग जागृती आदी उपक्रम राबविले. ओढा खोलीकरणामुळे अनेक गावे टॅंकरमुक्त झाली. मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरामुळे अनेकांना दृष्टी मिळाली. राज्यसभा खासदारपदी संधी मिळाल्याने त्या संधीचे सोने करतील. बारामती मतदारसंघातील प्रश्न मार्गी लागण्यास याची मदत होइल. सर्वसामान्यांना याचा फायदा होईल.
– जय पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस, बारामती.





