पुणे जिल्हा : रोजगार निर्मिती, ऊस उत्पादकांचे भरणेंपुढे आव्हान

इंदापूर तालुक्यातील तरुणाई, बळीराजाला योग्य न्याय द्यावा लागणार
लोणी देवकर – नुकतीच महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी झाली यामध्ये इंदापुरात गतवर्षी झालेली तिरंगी लढतीती विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी विरोधकांना मोठ्या मताधिक्याने पराभूत केले आणि आपल्या विजयाची हॅट्रिक साधली.मात्र आता आमदार भरणेंना तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांना न्याय देण्याचे तसेच युवकांना रोजगार निर्मितीचे तगडे आव्हान असणार आहे.
प्रतिस्पर्धी एका उमेदवाराकडे तालुक्यातील 2 सहकारी साखर कारखाने आहेत तर दुसर्या ने आपण नवीन खासगी साखर कारखाना काढून ऊस उत्पादक शेतकर्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. तर आमदार भरणे यांच्या नेतृत्वाखाली असणार्या कारखान्याला बारामतीच्या धर्तीवर बाजारभाव मिळणार का याकडे आता तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
तर इतर दोन सहकारी साखर कारखान्यांना शेतकरी ऊस देतात त्या कारखान्याचे वेळेवर ऊस बिल त्याची शाश्वती तसेच त्या कारखान्यांचा आगामी निवडणुका याविषयी आता शेतकर्यांच्या अपेक्षा असणार आहेत. तसेच नव्याने स्थापन होत असलेली जंक्शन औद्योगिक वसाहत तसेच
अगोदरची लोणी देवकर औद्योगिक वसाहत यामध्ये नवनवे उद्योग आणणे त्यामध्ये स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देने आदी आव्हान विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या समोर असणार आहेत. त्यामुळे जेवढ्या जास्त मताधिक्याने मतदारांनी निवडून दिले आहे तेवढ्याच जास्त अपेक्ष्यांच आव्हान आमदार भरणे यांच्या समोर असणार आहे.





