पुणे जिल्हा : इंद्रायणीला पुन्हा पूर
Updated On:

भक्ती सोपान पूल पाण्याखाली
आळंदी : मावळ भाग, धरण क्षेत्र भाग तसेच इतर सर्वत्र काही भागात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली असून भक्ती सोपान पूल शुक्रवार (दि.2) पासून पाण्याखाली आहे.
इंद्रायणी नदी काठचा दगडी घाट बर्यापैकी पाण्याखाली गेला असून नदी शेजारील भक्त पुंडलिक मंदिरचा काही भाग व दगडी घाट परिसर नदी पात्राच्या पाण्याखाली गेला आहे.
सिद्धबेट येथील जुना बंधारा पूर्ण भरून त्यावरून पाणी नदी पात्रात पडत होते. दि.25 जुलै रोजी आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या पूरा नंतर नदी पात्रातील पाणी हळू हळू ओसरले होते.
शुक्रवार पासून इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळी वाढ होताना दिसून येत आहे. इंद्रायणी नदी काठच्या दुतर्फा राहत असलेल्या रहिवाशांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.





