पुणे जिल्हा : पाच वर्षांत विकासात भारताचा क्रमांक वरचा असेल -आशोक टेकवडे

सासवडला मोदींच्या शपथविधीचे थेट प्रेक्षपण
सासवड – भारताची अर्थव्यवस्था आज जगामध्ये मोठी अर्थव्यवस्था आहे. त्या भारत देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांनी अतिशय सक्षमतेने पुढे नेले आहे. पाच वर्षांमध्ये तुमच्या माझ्या भारताचा क्रमांक हा विकासामध्ये आणि जे काही प्रगतिशील राष्ट्र आहे. त्याच्यामध्ये निश्चितपण हा वरच्या क्रमांकावर जाण्यासाठी मोदी हे तिसरा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाले आहे, असे प्रतिपादन माजी आमदार अशोक टेकवडे यांनी केले.
सासवड (ता. पुरंदर) येथील जयप्रकाश चौकात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आसलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण भारतीय जनता पार्टी सासवड शहर संतोष जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. पेढे भरवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाच्या काळामध्ये उत्तम काम केले आहे. देश पुढे नेताना सर्वोत्तम कामगिरी त्यांनी केली आहे. देशाची प्रगती करण्यासाठी मोदी यांचे योगदान हे मोठे आहे, असे भाजप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी सांगितले.
यावेळी माजी राज्य मंत्री विजय शिवतारे, भाजप सासवड शहराध्यक्ष संतोष जगताप, गंगाराम जगदाळे, रमेश इंगळे, वामण जगताप, साकेत जगताप, शिवसेना सासवड शहराध्यक्ष मिलिंद इनामके, गिरीश जगताप, अमोल जगताप, आनुराग टिळेकर, महेद्र जगताप, भगवान पवार, विश्वास पानसे, मोहन भैरवकर, उमेश जगताप, समीर कामत, समीर भिसे, श्रेयश जगताप, सूरज जगताप, सौरभ जगताप, आनंद जगताप, अरबाज आत्तार, उमेश जगताप, मंगेश भिंताडे, बिटु शिवरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अमोल जगताप, अरबाज आत्तार, आभिजित जगताप यांनी केले होते.





