पुणे जिल्हा : बारामतीत पदाधिकाऱ्यांनी समाजभान जपले

खासदार सुळे यांचा वाढदिवस साजरा
बारामती – खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. सुळे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बारामती शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
कोणतीही पोस्टरबाजी न करता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बारामती शहरातील कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर घेतले. उपक्रमामुळे रुग्णांना मदत होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष एस. एन. जगताप, शहराध्यक्ष संदीप गुजर, शहर युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे, क्रीडा सेलचे अध्यक्ष रवींद्र कराळे, प्रसिद्धीप्रमुख सुरज मालुसरे, कार्याध्यक्ष अक्षय शिंदे, पप्पू गोफणे, चंद्रकांत हिवरकर, बाबू सावंत, सचिन पलंगे, ॲड. शशिकांत पाबळकर, किरण चौधर, वैभव शिरहट्टी, बापूराव गायकवाड, महेश जगताप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





