Pune District : राजगुरूनगरातील काळे धंदे तात्काळ बंद करा

राजगुरूनगर : राजगुरूनगर व राजगुरुनगर परिसरातील अवैध जुगार, मटका, कॅफे, लॉज, क्लब हे काळे धंदे तात्काळ बंद करण्याचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी खेड पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना व पोलिसांना शनिवारी (दि.15) दिले.
पुणे ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख यांनी शनिवारी खेड पोलीस स्टेशनची तपासणी केली. यावेळी त्यांनी तालुक्यातील पोलीस पाटील, पत्रकार, विविध सामाजिक संस्थांचे पदाधीकारी, महिला दक्षता कमिटीच्या महिलांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
जिल्ह्यातील खेड पोलीस स्टेशन महत्त्वाचे पोलीस स्टेशन आहे.एमआयडीसी, विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ), आहे. त्यात कायदा सुव्यवस्था राखणे पोलिसांचे काम आहे. याबाबतचा आढावा घेण्यात आला आहे. एमआयडीसी, विशेष आर्थिक क्षेत्र यामध्ये पोलिसांच्या काही सेवा सुविधा लागतील त्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पोलीस स्टेशन तपासणीसह एमआयडीसी एसईझेड यांच्यातील उद्योजकांच्या बैठकांचे नियोजन केले आहे. इंडस्ट्रीजमधील गुंडगिरी, धमक्या, वर्चस्व, खंडणी यासा यावर पोलिसांचे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
त्यांच्यावर आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज केली आहे. तडीपारीपासून मोक्कापर्यंत कारवाई करण्यासाठी विशेष अधिकारी नेमले आहेत. राजगुरूनगरसह तालुक्यात अवैध लॉज, कॅफे, जुगार, मटका आणि गुंडगिरीचे बंद करण्यासाठी पोलिसांना आदेश दिले आहेत. त्याचा अहवाल आठ दिवसात संबंधीत पोलीस स्टेशनचे अधिकारी देतील. यावर तात्काळ कारवाई सुरु केली जाणार आहे.
व्हॉट्सअॅप नंबर रिलीज करणार
पुढच्या महिन्यात व्हॉट्सअॅप नंबर रिलीज करणार आहोत त्यावर सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी मागवून तात्काळ कारवाई केली जाणार आहे. रविवार (दि. 16) पासून तालुक्यातील अवैध लॉज केफे, जुगार यावर कारवाई केलेली दिसेल. खेड पोलीस स्टेशन अंतर्गत 4 जणांना तडीपार करण्याचीप्रक्रिया सुरु आहे तसे रेकॉर्ड बनवले जात आहे यात अजूनही काही जणांचा समावेश होणार आहे जे गुन्हेगारीत आहे.
16 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या…
काही गावात, शहरात टोळ्या चालवल्या जातात. अल्पवयीन मुलांचा वापर करून घेतला जात आहे. त्यांच्याकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून घेतले जात आहेत. या गुन्ह्यातील 16 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या गुन्हेगाराला जास्तीची शिक्षा कशी होईल याकडे पोलिसांचे लक्ष आहे.





