पुणे जिल्हा : वाढदिवसासाठी आलेल्या पत्नीवर पतिचा चाकू हल्ला
Updated On:

कोंढापुरीत घटना : पोलिसांत गुन्हा
शिक्रापूर – कोंढापुरी (ता. शिरुर) येथे बहिणीच्या मुलीच्या वाढदिवसासाठी आलेल्या महिलेवर महिलेच्या पतीने चाकूने हल्ला केली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय बाबुराव खरात (वय ४३, रा. तांदूळवाडी ता. बारामती), असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. कोंढापुरी येथे पल्लवी खरात या त्यांच्या बहिणीच्या मुलीच्या वाढदिवसासाठी आलेल्या असताना पल्लवी या सुल्झर कंपनी शेजारुन त्यांच्या बहिणीच्या घरी जात होते. पाठीमागून अचानक महिलेचा पती अजय खरात हा आला
. त्याने महिलेला शिवीगाळ, दमदाटी करीत जवळील चाकूने महिलेच्या शरीरावर वार केले. या घटनेत पल्लवी अजय खरात (वय ३९, रा. तांदूळवाडी ता. बारामती) ही महिला जखमी झाली. महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.





