Pune District : पळसदेवमध्ये कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

पळसदेव : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. या वेळी ग्रामपंचातीच्या वतीने गावातील महिला माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावातील डॉकटर, पोलीस पाटील, सीआरपी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, अशा सेविका, शिक्षण, बचत गट प्रतिनिधी व ग्रामपंचायत कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.
महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी पैठणीचा खेळाचे आयोजन करण्यात आले. खेळातील विजयी महिलांना पैठणी, पाणी जार व हॉटस्पॉट भेट देण्यात आली. यावेळी उपस्थित दीडशे महिलांना ग्रामपंचायतीच्या वतीने भगवत गीता भेट देण्यात आली. तर महिला सबलीकरण या बाबत करिष्मा गावडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी गट विकास अधिकारी सचिन खुडे, सरपंच अंकुश जाधव, कैलास भोसले, ग्रामसेवक तुकाराम शिंदे, भूषण काळे, स्वप्नील काळे, डॉकटर प्रियंका काळे, डॉकटर ईशा बंगेरा, महेंद्र काळे, इंद्रायणी मोरे, पुष्पलता काळे, दीपाली काळे, कविता शिंदे, अंजना बनसुडे, कोमल बनसुडे, जयश्री शेलार, सरला पवार, अनुजा काळे, अर्चना बांडे, सुरेखा जाधव, अश्विनी नरखेडकर, संध्याराणी गरड, विठ्ठल वागसकर, सुनील काळे सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





