पुणे जिल्हा : भोर येथे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ह्रदय दिन साजरा
Updated On:

भोर – श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र भोर यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा बसरापूर, बारे, म्हाळवडु, वीर बाजीप्रभू देशपांडे माध्यमिक विद्यालय शिंद याठिकाणी बाल संस्कार उपक्रमा अंतर्गत जागतिक हृदय दिनानिमित्त हृदय ठीक तर सगळे ठीक या संदर्भात विद्यार्थ्याना समजेल, अश्या साध्या सोप्या भाषेत स्वामी सेवक संतोष कदम यांनी माहिती दिली.
तसेच शनिवारचे औचित्य साधून श्री हनुमान चालीसाचे पठण अतुल धुमाळ यांनी केले. यावेळी नंदा भोमे, महेश खुटवड, नितीन इगवले, सचिन भालघरे, कैलाश खुटवड, नम्रता कोठावळे, बसरापूरच्या सरपंच सौ. झांजले, राजेंद्र थोरवत उपस्थित होते.
हृदय विकारापासून बचाव करण्यासाठी मधुमेह,उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक,तसेच व्यायामाचा अभाव, बैठे जीवन शैली व अयोग्य आहार या गोष्टी वर भर देणे गरजेचे असल्याचे कदम यांनी सांगितले.





