पुणे जिल्हा : यात्रा काळात भाविकांना आरोग्य सुविधा

आळंदी : श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी कार्तिकी यात्रेनिमित्त येणार्या भाविक वारकर्यांसाठी ग्रामीण रुग्णालय आळंदी कडून खालील आरोग्य सुविधा देण्यात येत असल्याचे आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक उर्मिला शिंदे यांनी सांगितले.
ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे 24 तास आरोग्य सेवा चालू आहेत, तसेच 5 खउण बेड ची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आळंदी शहरात आरोग्य सेवा देण्यासाठी 10 आरोग्य बूथ स्थापन करण्यात आले आहेत.
बुथ वरून अथवा रुग्णालयातून रुग्ण पुढील उपचारासाठी स्थलांतर करण्याची गरज पडल्यास पाच 102 आणि पाच 108 या 10 अँब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुग्णालयात ऑक्सिजन, शलस मशीन, आयसीयू व्यवस्था, ब्लड शुगर व इतर तपासण्या, एक्सरे, छोट्या मोठ्या सर्जरी, छोटे प्लास्टर, इ आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत.
हॉटेलमध्ये काम करणार्या कर्मचार्यांची वैद्यकिय तपासणी चालू आहे. शहरातील पाणी नमुने तपासणी चालू आहे. कीटकजन्य आजार उत्पत्ती होऊ नये म्हणून धूर फवारणी आणि सर्वेक्षण चालू आहे. ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे आरोग्य शिक्षण दिले जाते आहे. ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे सर्व प्रकारचे तज्ञ अधिकारी प्रतिनियुक्तीवर नेमणूक करण्यात आले आहेत.
माऊली मंदिर येथे ग्रामीण रुग्णालय चे दोन बूथ केले आहेत. पैकी एक दिवसभर चालणार असून दुसरा दिवस रात्र चालणार आहे. तिथे ताप पाहण्यासाठी थर्मल गन, ऑक्सिजन पातळी पाहण्यासाठी मशीन, सलाईन व्यवस्था, सर्व उपयुक्त गोळ्या औषधे, मलम, कफ सिरप, इंजेक्शन्स एक बेड अशी उपयुक्त व्यवस्था ठेवण्यात आली आहे. बूथ वर दोन डॉक्टर्स, एक सिस्टर, दोन इंटर्न डॉक्टर्स आणि एक शिपाई असे मनुष्यबळ देण्यात आले आहे. महत्त्वाच्या दिवशी तिथे आपण भूलतज्ज्ञ सेवा उपलब्ध करणार आहोत.
-ऊर्मिला शिंदे, आळंदी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक





