पुणे जिल्हा : हर्षवर्धन पाटील यांचे संकल्पपत्र जाहीरनामा प्रसिद्ध

सर्वसामान्यांना बळकटी देण्याचा संकल्प – तेजसिंह पाटील
इंदापूर – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे, महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना सरकारमध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे, त्यांचे संकल्पपत्र म्हणजे इंदापूर तालुक्यातील, शेतकरी, जनसामान्य, विद्यार्थी एकंदरीतच सर्व घटकांना बळकटी देणारे संकल्प पत्र आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील यांनी व्यक्त केले.
इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात शुक्रवारी (दि. 15) सकाळी 11 वाजता संकल्पपत्र तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील यांच्या हस्ते जाहीर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष इनायतअली काझी, दादासाहेब भिसे, अनिल पवार, उपाध्यक्ष सिकंदर बागवान,
शहर युवक अध्यक्ष श्रीकांत मखरे, संजय शिंदे, ललेंद्र शिंदे, गोरख शिंदे, शिवसेनेचे संजय खंडाळे, अजिंक्य ढाणे, अक्षय भोसले, अजय पारसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तेजसिंह पाटील यांनी, इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, करण्यात येणार्या विविध विकास कामे, विविध योजना, शहर सुशोभीकरण,
तालुक्यातील विविध प्रश्न, शेतकर्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, युवकांच्या रोजगाराचा प्रश्न, तसेच भविष्यात इंदापूर तालुक्याचा विकासात्मक कायपालट करण्यासाठी करण्यात आलेल्या विविध योजना आणि विकास कामांची यादीच तेजसिंह पाटील यांनी वाचून दाखवली.





