पुणे जिल्हा : सासवड पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

फराळ शिधा वाटप : आमदार जगताप विचार मंचाचा सातत्यपूर्ण उपक्रम
सासवड – सासवड नगरपालिकेच्या आरोग्य आणि पाणीपुरवठा विभागातील दिडशेहून अधिक कर्मचाऱ्यांना आमदार संजय चंदूकाका जगताप विचार मंचाच्या वतीने माजी नगरसेवक अजित जगताप यांच्या पुढाकारातून दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी सणानिमित्त भेट म्हणून दिवाळी फराळाचे शिधा किटचे वाटप मंगळवारी (दि. 7) आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार संजय जगताप विचार मंचाच्या वतीने आरोग्य व पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना गेल्या 15 वर्षांपासून दिवाळीनिमित्त पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मिठाई, कपडे, साडी आदींचे वाटप करण्यात येत असून यावर्षीदिवाळी फराळासाठी लागणाऱ्या सर्व पदार्थाच्या किराणा किटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आमदार संजय जगताप, मुख्याधिकारी कैलास चव्हाण, नगरसेवक सुहास लांडगे, यशवंतराव जगताप, विजय वढणे, मनोहर जगताप, संजय ग जगताप, संतोष खोपडे, मनोज म्हेत्रे, विचार मंचाचे अध्यक्ष अजित जगताप, आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, विचार मंचाचे संजय (मंत्री) जगताप, बापू गायकवाड, राजेंद्र भोंडे, चेतन महाजन आदी याप्रसंगी उपस्थित होते.





