Pune District : नीट परीक्षेमध्ये ’गुरुकुल गोखळी पॅटर्न’चा दबदबा कायम

72 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 11 विद्यार्थ्यांनी 400 पेक्षा अधिक गुण मिळवले
इंदापूर – गुरुकुल विद्यामंदिर गोखळीने आपल्या यशाची परंपरा नीट परीक्षेत कायम राखली आहे. संस्थेचे 72 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, त्यापैकी तब्बल 11 विद्यार्थ्यांनी 400 पेक्षा अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यामुळे नीट परीक्षेमध्ये संस्थेचे संस्थापक बाळासाहेब हरणावळ यांच्या मार्गदर्शनाखाली ’गुरुकुल गोखळी पॅटर्न’चा दबदबा कायम राहिला आहे.
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी नीट एनटीएने नीट यूजीचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. ही परीक्षा देशभरातील तसेच परदेशातील परीक्षा केंद्रांवर 4 मे रोजी घेण्यात आली होती. 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. हे यश ’गुरुकुल गोखळी पॅटर्न’च्या दर्जेदार मार्गदर्शनाचे प्रतिक आहे.
मागील शैक्षणिक वर्ष 2024 मध्ये देखील संस्थेचे 16 विद्यार्थी चइइड साठी निवडले गेले होते, तर 3 विद्यार्थ्यांनी इतडल साठी प्रवेश घेतला होता. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी बीडीएस, बीएचएमएस आणि बीएएमएस यांसारख्या अभ्यासक्रमांमध्ये यशस्वीपणे प्रवेश मिळवला होता. गुरुकुल गोखळीने या निकालाद्वारे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.





