Pune District : बियाणांसाठी दिलेल्या भूईमूगाच्या शेंगा निघाल्या निकृष्ट

मंचर : कृषी विभागाच्या वतीने १०० टक्के अनुदानावर भूईमूगाचे बी तयार करण्यासाठी भूईमूगाच्या शेंगा दिल्या. त्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप धामणी (ता.आंबेगाव) येथील शेतकरी अशोक जाधव पाटील यांनी केला आहे.
कृषी विभागाच्या वतीने शेतकर्यांना भुईमुग शेंगा उत्पादन करण्यासाठी १०० टक्के अनुदानावर बी तयार करण्यासाठी शेतकऱ्र्यांना वीस किलो भूईमूगाच्या शेंगाच्या पिशव्या देण्यात आल्या.
भुईमुगाच्या शेंगामध्ये सोंडकिडे, टरफलेंशिवाय फुटलेल्या शेंगा दिसून आल्याने शेतकऱ्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निरगुडसर येथील मंडल कृषी कार्यालयाच्या वतीने धामणी, खडकवाडी, पोंदेवाडी, जारकरवाडी व इतर गावातील सत्तर शेतकऱ्र्याना भूईमूगाच्या शेंगा बी तयार करण्यासाठी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.परंतु शेगांचा दर्जा व्यवस्थित नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
नॅशनल सीड कार्पोरेशन यांच्या वतीने भुईमूग शेगांचे शंभर टक्के अनुदानानुसार शेतकऱ्र्यांना वाटप करण्यात आले. ऑनलाईन लॉटरीद्वारे के १८१२ व्हरायटी असणाऱ्या शेंगाचे वाटप केले. काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात आले आहे.
– सिद्धार्थ ढवळे, तालुका कृषी अधिकारी, आंबेगाव तालुका.





