पुणे जिल्हा : संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

पारगाव शिंगवे : आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे शूर वीर जीवा महाले नाभिक प्रतिष्ठानच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
यावेळी सकाळी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व गावातून प्रतिमेची वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर हरिभक्त परायण बाळ श्रीराम महाराज मिंडे यांचे हरिकीर्तन झाले. नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम ग्रामस्थांच्या वतीने पार पडला.
यावेळी माजी सभापती देवदत्त निकम व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप दादा वळसे पाटील पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखिले, शरद बँकेचे संचालक दौलतराव लोखंडे, सरपंच श्वेता ढोबळे,उपसरपंच नितीन ढोबळे, राजू ढोबळे, गणपतराव शिरसागर ,दत्तात्रेय देवडे, बबनराव ढोबळे ,
निवृत्ती ढोबळे, सुनील शिंदे, दीपक साबळे, साईनाथ गायकवाड, तेजस जगताप, गोकुळ देवडे, माऊली देवडे, नंदू देवडे, रत्नाकर कोराळे ,दत्ता जाधव ,सचिन देवडे, बजरंग देवडे, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते .





