Pune District : वाघोलीत भव्य दीपोत्सव साजरा

वाघोली : अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त बुधवारी (दि. 22) सायंकाळी वाघोलीतील धार्मिक स्थळांवर दीप प्रज्वलन करत दीपोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी श्री वाघेश्वर मंदिर, प्रभू श्रीराम मंदिर, श्री हनुमान मंदिर परिसर दिव्यांच्या लखलखाटांनी उजळून निघाला होता. यावेळी परिसरामध्ये भव्य अशी फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे वाघोली शहराध्यक्ष विजय जाचक यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी वाघोली शहर व संलग्न आघाडी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, उत्तर भारतीय आघाडी आणि ग्रामस्थ यांच्या माध्यमातून भव्य असा दीपोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी ग्रामस्थांनी सहभाग नोंदवल्याचे पाहायला मिळाले.
ज्याप्रकारे देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात प्रगती चालू आहे व राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जे व्हिजन ठेवले आहे. त्याचप्रमाणे पुढील काळात वाघोली प्रभागात देखील पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना /ग्रामस्थांना उत्तम प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा देण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे.
-विजय जाचक, अध्यक्ष भाजपा वाघोली शहर
या कार्यक्रमासाठी माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, भाजपा पुणे जिल्हा सचिव प्रदिप सातव, तालुका सरचिटणीस गणेश चौधरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संजय कड, सुरेश जगताप, चिन्मय सरकार, अमित वाघोलीकर, चेतन राऊत, गणेश सातव, दिलीप तांबे, चेतन जगताप, शिवदास पवार यांच्यासह महिला मोर्चा भाजपा वाघोली आणि सनातन परिषद वाघोली यांनी विशेष परिश्रम घेतले.





