Pune District : शेतकर्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन कटीबद्ध

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आश्वासन
वाघोली – कृषी खात्याच्या माध्यमातून शेतकर्यांच्या अडीअडचणी दूर करून शेतीसाठी योग्य निर्णय घेण्याचा तसेच ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या मुलांनाही क्रीडा क्षेत्रात योग्य संधी मिळावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
लोणीकंद येथील श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू टाइम स्कूलच्या प्रांगणात महाराष्ट्र आणि गोवा प्रदेशातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ तथा सीबीएससी द्वारे आयोजित नवव्या सीबीएससी क्लस्टर क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. दिगंबर दुर्गाडे, संचालक प्रवीण शिंदे, द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष भरत शिंदे, उद्योजक सुमित बाजारे, भरत खेडेकर,
आदित्य गायकवाड, शोभा पालवे, संस्थेचे अध्यक्ष मारुती रामचंद्र भूमकर, पांडुरंग भूमकर, गौरव भूमकर, अथर्व भूमकर, स्वप्निल भुमकर, शैलाजा भुमकर, मृणाल भूमकर, सोनाली बाजारे, सायली गायकवाड, प्राचार्य रितिका नायडू, दिलीप दंगेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तीन दिवसीय सीबीएससी शालेय क्रीडा स्पर्धेसाठी सुमारे 3000 विद्यार्थी सहभागी झाले होते.





