पुणे जिल्हा : आळंदीतील सफाई कर्मचार्यांचा गौरव

पूरस्थितीमध्ये मदतीचा हात देणार्यांच्या पाठीवर शिवसेनेची कौतुकाची थाप
आळंदी – येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला होता. अशा परिस्थितीत आळंदी नगर परिषदेतील आरोग्य विभाग, अग्निशामन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, सफाई कामगार अशा निरनिराळ्या विभागात काम करणार्या कर्मचार्यांनी इंद्रायणी घाटावर,
पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाणार्यांचा जीव वाचविला. तसेच दुसर्या दिवशी पुराचे पाणी ओसरताच पुलावर साचलेली जलपर्णी, राङारोडा काही तासांतच साफसफाई करून या दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. त्यांनी केलेल्या कामाचा आळंदी शहर शिवसेनाप्रमुख राहुल चव्हाण यांनी सर्व सफाई कामगारांचा आळंदी नगर परिषदेमध्ये त्यांना शाल श्रीफळ माऊलींची प्रतिमा व पुष्पगुच्छ देत यथोचित असा सन्मान केला.
यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे, अग्निशमन विभाग प्रमुख सचिन गायकवाड, विष्णू कुमार शिवशरण, फायरमन तुळशीराम कोळपे, पद्माकर श्रीरामे, प्रसाद बोराटे, अक्षय त्रिभुवन, ड्रायव्हर ऑपरेटर विलास पवार, विनायक सोळंकी, अजय वैरागे, नंदू जाधव, मनोज राठोड, रामदास दाभाडे, रुक्मिणी कांबळे, संदेश तापकीर, ज्ञानेश्वर गारकर, रोहिदास कदम, सचिन शिंदे, कृष्णा मोगल आदी उपस्थित होते.





