पुणे जिल्हा : गलांडवाडीत आल्याची शेती यशस्वी

शेतकरी भारत शिंदे यांचा प्रयोग ः पहिल्याच वर्षी 22 लाखांचय उत्पादनाची अपेक्षा
दिड एकरात लागवडीसाठी सात लाखांचा खर्च
खर्च वजा जात 15 लाख रुपये निव्वळ उत्पन्न
प्रयोगशील शेती पाहण्यासाठी परिसरातून होतेय गर्दी
कृशि क्षेत्रातील मान्यवरांकडून मिळतेय मार्गदर्शन
इंदापूर – शेतीमध्ये सध्या अनेक नवनवीन प्रयोग केले जात आहे.शेतकरी नवनवीन पिकांची लागवड करत आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील आदर्श शेतकरी भारत मल्हारी शिंदे या शेतकर्याने गलांडवाडी नं. दोन येथील शेतात दीड एकर आले शेती केली आहे. कृषी क्षेत्रातील मान्यवर या आले शेतीला भेट देऊन, नवी पीक पद्धतीला व या आले शेतीतून मिळणारे लाखो रुपयाचे उत्पन्न याबाबत ग्रामीण शेतकर्यांना अद्यावत माहिती पुरवताना दिसत आहेत.
शेतीमध्ये सध्या ते केवळ धान पिकावर अवलंबून न राहता विविध पिकांची लागवड शेतकरी राजा करत आहे. पीक पद्धतीत बदल करण्याच्या उद्देशाने भारत शिंदे यांनी यंदा दिड एकरात आले पिकाची लागवड केली.
पहिल्याच वर्षी अंदाजे त्यांना 22 लाख रुपयांचे आले उत्पादन मिळणार आहे. यामध्ये त्यांना आले पिकासाठी त्यांना एकूण 7 लाख रुपये खर्च आला आहे. अर्थात खर्च वजा जाता त्यांना आले पिकातून एकूण 15 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे.
आपण यावर्षी प्रथमच आले पिकाची लागवड केली होती.ज्यातून आपल्याला एकरी 80 क्विंटल इतके विक्रमी उत्पादन मिळेल.याशिवाय यावर्षी आल्याला बाजारभाव देखील चांगला मिळाला असून, बाजार समितीमध्ये घाऊक बाजारात आपल्याला चांगला दर मिळेल.यामुळे शेतकर्यांनी इतर खर्चिक शेती न करता आल्याची शेती करावी.
-भारत शिंदे, शेतकरी गलांडवाडी





