Pune District : कर्हा नदीवरील गराडे धरण भरले

सासवड शहरासह ग्रामीण भागील पाणीप्रश्न मिटला
गराडे – पुरंदर तालुक्यातून वाहणार्या कर्हा नदीवरील ग 65.67 दशलक्ष घनफूट क्षमतेचे गराडे धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे सासवड शहरासह ग्रामीण परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
सध्या धरणातून कर्हा नदी तसेच पश्चिम भागातील सर्व बंधार्यात विसर्ग सुरू आहे. ते भरल्यानंतर नाझरे धरणाकडे विसर्ग सुरू होईल, अशी माहिती गराडे पाटबंधारे शाखा अभियंता अविनाश जगताप यांनी दिली.
गराडे धरण भरल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे. या धरणातील पाण्याचे पूजन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे आणि ग्रामस्थांनी केले. यावेळी पुरंदर तालुका भाजपा अध्यक्ष(पश्चिम) संदीप कटके, अॅड.शिवाजीराव कोलते, सरपंच नवनाथ गायकवाड, अशोक गोगावले, गोपाळ कामठे, संदीप कदम, निलेश जगदाळे,
जालिंदर वाडकर, निलेश तळेकर, सुरज औचरे, संजय कामठे, सुदर्शन कुदळे, शांताराम दळवी, सुनिल पवार, रोहित खवले, बाळासाहेब रावडे, मयूर फडतरे, योगेश जगदाळे, धोंडिबा खवले, हनुमंत खवले, लहु जगदाळे, बंडू जगदाळे, नितीन जगदाळे, नितीन शं.जगदाळे, भाऊसाहेब रावडे, विजय जगदाळे, सुधीर जगदाळे, महेश तळेकर, अविनाश जगदाळे, शिवाजी शेंडकर, शामराव लिंभोरे, हनुमंत काळाणे व गराडेकर ग्रामस्थ उपस्थित होते.





