Pune District : आळेफाटा परिसरात चोर्या करणारी टोळीचा पर्दाफाश

एकास अटक : 11 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
बेल्हे – जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील लक्ष्मी इंटरप्रायजेस किराणा मालाच्या दुकानाच्या सुरक्षारक्षकाचे अपहरण करून जबरी चोरी करणार्या पर जिल्हातील अट्टल टोळीचा पर्दाफाश झाला असून एकास आळेफाटा पोलिसांनी जेरबंद केले आहे. दरम्यान, आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह 11 लाख 96 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सलमान सादीख शेख (रा. मोमीनपुरा, खाजानगर, बीड, ता.जि. बिड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक विश्वास जाधव म्हणाले की, दि. 20 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आळेफाटा गावचे हद्दीत लक्ष्मी इंटरप्रायजेस दुकानात सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असलेला जगदिश गणेश गतवा बम (वय 48, रा. आळेफाटा) यास एका पांढच्या रंगाच्या स्विफ्ट कारमधील चार अज्ञात चोरट्यांनी बसवून घेतून मारहाण करून त्याचा मोबाइल व त्याच्या खिशातील 1 हजार 500 रूपये रोख रक्कम काढून घेवून त्याला बोटा (ता. संगमनेर जि.अहिल्यागनर) गावच्या हद्दीत सोडून देवून तसेच दुकानाचे लोखंडी शटर उचकटून आत प्रवेश करून दुकानातील 2 लाख 53 हजार 200 किंमतीचे सिगारेट व गायछाप चोरून नेले बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचे गांर्भाय लक्षात घेता पोलीस निरीक्षक जाधव यांनी गुन्हे पथकाला हा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सूचना केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शोध पथक शोध घेत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे व खबर्यामार्फत माहिती मिळाली की हा गुन्हा आरोपी सलमानने व त्याच्या साथीदारांनी त्यांच्याकडील स्विफ्ट डिझायर कार व इनोव्हा गाडीतून येवून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली,
त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शोध पथक हे बिड जिल्ह्यात जावून सलमानला कार (एमएच 13 डीवाय 5920) सह सापळा रचून ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने सखोल बौकशी केली असता त्याने त्याचे सात साथीदारांसह गुन्हा केला असल्याची कबुली दिली.





