पुणे जिल्हा : चिंबळीत ढोल-ताशाच्या गजरात गणेश मुर्तींची प्राणप्रतिष्ठा
Updated On:

चिंबळी : येथील पदमावत्ती तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पारंपारिक पध्दतीने ढोल ताशाच्या गजरात गणेश मुर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी मूर्तीची मिरवणूक काढून विद्युत रोषणाई व फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.
हनुमान तरुण मंडळ व भैरवनाथ गणेश मित्र मंडळ तसेच राजे शिवछत्रपती तरुण मंडळाच्यावतीने ही विद्युत रोषणाई व फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
मिरवणुकीनंतर मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात गणेश मुर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी मडाळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक व ग्रामस्थ तसेच आजी माजी पदाधिकाऱ्यांसह तरुण नागरिक मोठ्या सख्येंने उपस्थित होते.





