पुणे जिल्हा : मराठा, कुणबी युवकांना पशुपालनाचे मोफत प्रशिक्षण

पळसदेव – छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पुणे यांच्या वतीने मराठा व कुणबी समाजातील युवक-युवतींसाठी मोफत पशुपालन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान सुमारे 30 लाभार्थीं या प्रशिक्षणचा लाभ घेतला असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी मदनकुमार शेळके यांनी दिली.
बारामती येथे मराठा समाजासाठी 1 महिन्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. हा प्रशिक्षण कार्यक्रम सारथीचे डॉ. श्रीकांत देशमुख, सतीश पाटील, एमसीईडीचे विभागीय अधिकारी अभिराम डबीर, सुदाम थोटे यांच्या मार्गदर्शनाखालीपार पडला.
प्रशिक्षण दरम्यान लाभार्थ्यांना शेळी-मेंढी पालन, कुक्कुट पालन, गाई पालन, मत्स्य पालन इत्यादी व्यवसाय बाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षण दरम्यान लाभार्थींनी बारामती येथील कृषी केंद्राला भेट दिली. आधुनिक पशुपालन, आधुनिक शेळी पालन, मस्त्य पालन, याबाबत मार्गदर्शन घेतले. या वेळी लाभार्थी, विद्यार्थी कृषी विज्ञान केंद्रात भेट दिल्यामुळे भारावून गेले.
तेथील तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचा व्यवसाय उभा करणार असल्याचा निर्धन व्यक्त केला. मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल सारथी व एमसीईडीचे आभार मानले. कार्यक्रम संपन्न होण्यासाठी प्रकल्प अधिकारी मदनकुमार शेळके, सहायक स्वाती धानोरकर कार्यक्रम समन्वयक रामदास पवार यांनी परिश्रम घेतले.





