पुणे जिल्हा : चांबळीत 300 जणांची मोफत नेत्र तपासणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य
गराडे – चांबळी (ता. पुरंदर) येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिवे गावचे माजी सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) पार्टीचे पुरंदर तालुका युवक अध्यक्ष अमित झेंडे यांनी व अमित झेंडे युथ फाउंडेशनच्या वतीने चांबळी गावात नेत्र तपासणी शिबिर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन गावातील ज्येष्ठ नागरिक यशवंत कामठे यांच्या हस्ते करण्यात आले असून यात 300 नागरिकांनी लाभ घेतला.
यामध्ये 29 नागरिकांना मोतीबिंदू अढळला आसून त्यांचे ऑपरेशन पुणे येथे करण्यात येणार आहे. गरजवतांना चष्मे वाटले तर ज्यांना मोतीबिंदू झाले त्यांना पुढची तारीख सांगून त्यांचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. तसेच यार रुग्णांना पुण्यात ने-आण व त्यांचे ऑपरेशन फाउंडेशनच्यावतीने मोफत करण्यात येणार आहेत.
दरम्यान, चांबळी गावातील शिबिरात गावच्या सरपंच प्रतिभा कदम, माजी उपसरपंच संजय कामठे, शरद कामठे, भाऊसाहेब कामठे, नवनाथ कामठे, शिवदत्त कामठे, अशोक कामठे, मारुती कामठे, बाबू कटके, नवनाथ गायकवाड, संभाजी शेंडकर, भगिरत कामठे, धनंजय कामठे, नितीन शेंडकर, राहुल कामठे, राकेश कामठे आदींह अन्य कार्येकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.





