पुणे जिल्हा : भिगवण रस्त्यावर चारचाकी उलटली ; २ शिकाऊ वैमानिकांचा जागीच मृत्यू

दोघांची प्रकृती चिंताजनक
बारामती : भिगवन रोडवरील जैनकवाडी ( ता. बारामती ) येथे शिकवू वैमानिकांच्या चार चाकी गाडीला अपघात झाला. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले . रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे जैनक वाडी गावामध्ये, लामजेवाडी गावाजवळ बारामती येथे वैमानिक प्रशिक्षण घेणारे चार विद्यार्थी बारामतीहून भिगवन च्या दिशेने टाटा हरिअर गाडी नंबर ( BR 03 AM 9993) या गाडीतून जात होते.
वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे गाडी उलटली. या अपघातात दक्षू शर्मा (वय 21 मूळ राहणार दिल्ली) आदित्य कणसे (मूळ राहणार मुंबई) हे दोघे अपघातात ठार झाले.
मुलगी चेष्टा बिश्नोई (मूळ राहणार राजस्थान ), कृष्णासून सिंग (रा. बिहार) या दोघांवर भिगवण येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
अपघात झाल्याचे समजताच भिगवण व बारामती तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होत खाजगी ॲम्बुलन्स चालक केतन वाहक याच्या मदतीने जखमींना उपचारसाठी भिगवन येथे नेहले.





