शिक्रापूर : पुणे ग्रामीण पोलीस दलातील तब्बल 59 पोलीस कर्मचार्यांच्या पोलीस हवालदार पदाहून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली.
शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे व नंदकुमार केकाण यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर तर पोलीस हवालदार राजेश माने व लहानू बांगर यांची सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी याबाबतचे आदेश काढले आहे, तर शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पदोन्नती झालेल्या चौघांचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, रोहिणी सोनावले, राहुल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सोमनाथ कचरे, विजय म्हस्कर यांनी अभिनंदन केले असून चौघांच्या झालेल्या पदोन्नतीमुळे त्यांचे पुणे जिल्ह्यातून कौतुक होत आहे.