Pune District: जुन्नर बाजार समितीचे माजी सभापती रामभाऊ बोरचटे यांचे निधन
Updated On:

बेल्हे : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामभाऊ कृष्णाजी बोरचटे (वय 80) यांचे बेल्हे येथे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पडल्यानंतर त्यांनी बेल्हे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.
बेल्हे, गुंजाळवाडी, बांगरवाडी, कोंबरवाडी, यादववाडी, गावच्या जडणघडणेमध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे. सहकार क्षेत्रातबरोबर राजकीय क्षेत्रात त्यांनी उत्तम काम केले तसेच त्यांच्या काळात अनेक कार्यकर्ते घडवण्याचे काम केले तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांची महत्त्वाची भूमिका होती. बोरचटे यांचा राजकीय क्षेत्रात मोठा दबदबा होता.





