Pune District : शहा ग्लोबल स्कूलमध्ये ‘वन महोत्सव’ उत्साहात

इंदापूर – इंदापूर येथील शहा ग्लोबल स्कूलमध्ये वन महोत्सवाचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. पर्यावरण जतनाची जाणीव आणि वृक्षारोपणाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या देवयानी पवार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमास कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा, शहा परिवाराचे मुकुंद शहा, निनाद शहा, शंतनू जगताप, माऊली खाडे, भारवी मुलमुले, शेखर जाधव, कॉ. संतोष वाघचौरे, गोपीनाथ मोरे, संदीप जाधव, पर्यावरण संरक्षक अशोक चिंचकर, योग प्रशिक्षक दत्तात्रय अनपट व त्यांची टीम, रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष नितीन शहा आणि शाळेच्या व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात लघुउद्घाटन समारंभाने झाली. देवयानी पवार यांनी पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले, ज्यामध्ये देशी व औषधी वनस्पतींचा समावेश होता.
इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे या अभंगावर नाट्य सादरीकरण करून झाडांचे जीवनातील महत्त्व प्रभावीपणे मांडले. इयत्ता 3 री आणि 4 थीच्या प्रांजल थोरात, अनुश्री मगर, नंदिनी रणदिवे, स्वराली शेंडे यांनी निसर्गावर कवितांनी कार्यक्रमात रंग भरले.
इयत्ता 4 थीच्या सोहम होळकुंदे याने वन महोत्सवावर भाषण सादर केले. इयत्ता 2 रीच्या आरुषी शेंडे हिने झाडांच्या उपयोगांवर प्रभावी सादरीकरण सादर केले. कार्यक्रमाचा समारोप निसर्ग रक्षणाची शपथ घेऊन झाला. विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्या दरेकर आणि कल्याणी यादव यांनी केले. संपूर्ण वन महोत्सव हा शाळेचे संचालक अंगद शहा आणि संचालिका रुचिरा शहा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.





