Pune District : दिंडीतील वारकऱ्यांना अन्नदान सेवा

वीसगाव खोरे – श्रीसंत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा, भोर आणि खंडाळा तालुका वारकरी साहित्य परिषद, भोर, शिरवली, कान्हवडी, भोर परिसरातील दिंडी सोहळ्याचा रात्रीचा मुक्काम शिरवळ येथील सहारा पॅकेजिंग कंपनीमध्ये करण्यात आला. त्यावेळी दिंडीचे स्वागत सहारा कंपनीचे अध्यक्ष, सेवा निवृत्त प्राचार्य रमेश बुदगुडे, माजी सरपंच महादेव बुदगुडे, जालिंदर बुदगुडे, जगन्नाथ येलगुडे, वसंत बुदगुडे यांनी केले.
योग प्रशिक्षक यशवंत भेलके यांनी वारकऱ्यांचा योगाचा वर्ग घेतला. वारकऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सहारा कंपनीचे अध्यक्ष रमेश बुदगुडे यांचे वतीने अन्नदान करण्यात आले. वारकऱ्यांनी भजनाचा आनंद लुटला.
याप्रसंगी तालुका मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष रमेश बुदगुडे यांनी सूत्रसंचलन केले. याप्रसंगी रामचंद्र चंदनशिव, चंद्रकांत चंदनशिव, योग शिक्षक यशवंत भेलके, प्रिया जाधव, दीपा चव्हाण, कैलास सूर्यवंशी, भाबवडी गावचे ग्रामस्थ, वारकरी उपस्थित होते.





