Pune District : गणेशोत्सववात नियमांचे पालन करा

नेताजी गंधारे : गणेश मंडळाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना आवाहन
पारगाव शिंगवे – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी येणारा गणेशोत्सव हा शांतेत व योग्य सूचनेचे पालन करुन आनंदाने साजरा करावा, असे आवाहन पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी केले.
पारगाव पोलीस ठाण्यात हद्दीत येणार्या सार्वजनिक गणेशोत्सवच्या अनुषंगाने तालुक्यातील पूर्वभागातील अनेक गावांमधील गणेशोत्सव मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. गंधारे म्हणाले, रजिस्टर नसलेल्या गणपतीमंडळांनी धर्मदाय आयुक्त यांचे कडुन तात्पुरता परवाना घेणे जरूरीचे आहे. तात्पुरते लाईटचे कनेक्शन घेणे. तसेच पोलीसविभाग, नगरपालीका, ग्रामपंचायत, महावितरण, यांची परवानगी प्राप्त करावी. दिवसा व रात्रीच्या वेळी मुर्तीचे संरक्षण तसेच मुर्तीचे दागिन्यांचे संरक्षण या करीता आपले मंडळाचे वतीने स्वयंसेवक सुरक्षा रक्षक नेमणे, त्याची संपूर्ण जबाबदारी आपली असावी.
गणेशोत्सव साजरा करताना मंडपामध्ये किंवा गणपतीचेमुर्तीचे ठिकाणी करण्यात येणारी वीज जोडणी व विद्युत रोषणाई सुरक्षित एमएसईबी कार्यालयातील संबधित कर्मचा-यांकडून तपासणी करून तसे प्रमाणपत्र घ्यावे. प्रत्येक मंडळाने आपले अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी यांचे संपूर्ण, नाव, पत्ता, मोबाईल नंबरची यादी मंडळा समोर दर्शनी भागात लावावी गणपतीच्या मुर्तीच्या संरक्षणाकरिता 24 तास स्वयंसेवक नेमावेत.
श्री गणेश मुर्तीचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण व्हावे याकरिता उपाययोजना करावी. गणेश मंडपात आग प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनीक्षेपकावर दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालनकरण्यात यावे, पोलीसांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे काटेकोर पणे पालनकरावे. कोणत्याही स्वरूपाचा वाद टाळावा. लेझर लाईटचा वापर कोणीही करू नये असे निदर्शनास आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल.





