Pune District : सोपानकाका पालखी सोहळ्यात फुलांच्या पायघड्या

बारामतीत भक्तिमय वातावरणात स्वागत
बारामती – माळेगाव येथील प्रस्थानानंतर सायंकाळी ६ च्या सुमारास बारामती शहरात संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी (दि २८) कसबा येथे आगमन झाले. यावेळी प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी नगरपालिकेच्या वतीने उभारलेल्या स्वागत कक्षात प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार यांनी प्रशासनाच्या वतीने तर बारामती नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी पालखी सोहळ्याचे, पालखी सोहळा प्रमुख त्रिभुवन गोसवी यांचे स्वागत केले. यावेळी पालखी सोहळ्याच्या मानाच्या अश्वाचे पूजन केले. यावेळी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.
धो. आ. सातव विद्यालयाच्या वतीने विद्यार्थी आणि शिक्षकांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी बारामती नगरपरीषदेेचे उद्यान विभाग प्रमुख महेश आगवणे, उपमुख्याधिकारी गोरख वायाळ, सहायक कार्यालय पर्यवेक्षक संजय चव्हाण, कार्यालय पर्यवेक्षक अश्विनी अडसूळ, लेखाधिकारी तुषार माेरे आदी उपस्थित होते.
बारामती तालुका दूध उत्पादन संघाच्या वतीने वारकरी भाविकांना केळी, बिस्कीट आणि पाणी वाटपाचा उपक्रम राबविला. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आण्णासाहेब शितोळे देशमुख मित्र परीवाराच्या वतीने गावरान तुपातील लापशी, गावरान तुपातील सांबर,जिरा राइस, मिक्स व्हेज, भेंडी आदी पदार्थांची वारकरी भाविकांसाठी रुचकर भोजनाची साेय केली.





