पुणे जिल्हा : वाल्ह्यात फटाक्यांची आतषबाजी

महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
वाल्हे – राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांची खासदार म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल वाल्हे (ता. पुरंदर) येथील महायुतीतील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
सुनेत्रा पवार यांची राज्यसभा खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल महायुतीच्या वाल्हे व पंचक्रोशीच्या वतीने वाल्हे येथील गांधी चौकातील, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास भाजपचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते,
माजी सरपंच दत्तात्रेय पवार, अतुल गायकवाड आदींच्या उपस्थितीत बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पेढे वाटप करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी वागदरवाडी सरपंच सुनिल पवार, सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार, सत्यवान सूर्यवंशी, उद्योजक राहुल यादव, अशोक बारकडे, तंटामुक्ती अध्यक्ष जयवंत भुजबळ, माजी उपसरपंच सूर्यकांत पवार, पोपटनाना पवार, मनोज भुजबळ, सागर भुजबळ, प्रदीप चव्हाण, तेजस दुर्गाडे, दीपक कुमठेकर, रोहिदास पवार, अभी दुर्गाडे, नितीन गावडे आदींसह महायुतीची सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





