पुणे जिल्हा : मनात भावना, पुण्य हवा – देशमुख

भक्तनिवास प्रकल्पासाठी बनकर कुटुंबीयांकडून लाखाची देणगी
चिंबळी – घराचा पाया खोदकाम करताना किंवा पुंजताना नेहमी समाधानी व मनात भावना, पुण्य असले पाहिजे, असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी केले.
चिंबळी येथील माजी सरपंच व खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पांडुरंग बनकर यांनी एक सामाजिक दायित्व समजून किर्तन सवेचे आयोजन केले होते, त्यावेळी देशमुख बोलत होते. यावेळी प्रगतिशील शेतकरी स्व. विष्णू मारूती बनकर यांच्या स्मरणार्थ पांडुरंग बनकर, माजी सरपंच संगिता बनकर,
युवा उद्योजक संतोष बनकर यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील व वाढा तालुक्यातील अरणभेडी येथील श्रीसंत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी यांच्या मंदिराच्या भक्तनिवास प्रकल्प विकासकामांसाठी 1 लाख 1 हजार रुपये देणगी सावता महाराज वसेकर महाराज यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष साखर चंद महाराज लोखंडे, सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, सर्व सदस्य, ग्रामस्थ, आजी-माजी पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





