Pune District : ॲग्रीस्टॅकवर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी

निमोणे : ॲग्रीस्टॅकवर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन कृषी सहायक जयवंत भगत यांनी निर्वी धुमाळवाडी चिंचणी येथील शेतकऱ्यांना केले आहे.
भगत म्हणाले की, योजनेमध्ये राज्यातील सर्व शेतक-यांचा व शेतांचा आधार संलग्न माहिती संच फार्मर रजिस्ट्री) शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप झोन रजिट्री) व शेताचे भू संर्दभीकृत (जिओ रेफरन्स लॅन्ड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करणे व सातत्याने अद्यावत करणे इत्यादी कामकाज केले जाणार आहे.
राज्यातील शेतक-यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या राबविण्यात येणा-या विविध योजनांचा लाभ शेतक-यांना सुलभ पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध करणे आदी फायदे यामध्ये अंतभूत आहेत.
तरी ग्रामपंचायत कार्यालय अथवा ग्राम महसूल अधिकारी कृषी सहायक यांचीशी संपर्क करून मार्गदर्शन घ्यावे, सीएससी सेंटरवर जाऊन आपली नोंदणी शेतकर्यांनी करावी, असे भगत यांनी आवाहन केले आहे.





