पुणे जिल्हा : गंजलेल्या अवस्थेत पाच पिस्तूल सापडल्याने बारामतीत खळबळ
Updated On:

बारामती : शहरात गंजलेल्या अवस्थेतील पाच पिस्तुले आढळल्याने खळबळ उडाली आहे. महात्मा फुले साठवण तलावाच्या नजीक पिस्तुुल आढळले आहेत. याबाबत खबर मिळतच पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले.
शांत संयमी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या बारामती शहरात अशाप्रकारे पिस्तूल सापडल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पिस्तूल नेमकी आली कुठून याबाबत शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
बेकायदा पिस्तूल विक्रीची प्रकरणे यापूर्वी बारामती शहरात घडली आहेत. मध्य प्रदेशातून कमी किमतीत अशा प्रकारची शस्त्र उपलब्ध होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
गंजलेल्या अवस्थेतील सापडलेले पिस्तूल बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व इतर अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. एकदम पाच पिस्तूल कोणी आणून टाकले याबाबत शोध मोहीम सुरू आहे.





