मंचर : देशात सध्या रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. अनेक अत्यावस्थ रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नाही. रक्तदान केल्यावर अनेकांना जीवदान मिळते. यासाठी सेवाभावी संस्था, शासकीय संघटना, राजकीय पदाधिकारी यांनी वेळोवेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन पुणे जिल्हा भाजपा किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी केले.
मंचर (ता.आंबेगाव) येथे अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर प्रथम वर्धापन दिनानिमित्त राणा प्रताप प्रतिष्ठान मंचर व मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था मंचर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजप किसान मोर्च्याचे माजी जिल्हा अध्यक्ष संजय थोरात, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ\ ताराचंद कराळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप बाणखेले, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष सोपानराव नवले, ॲड . शुभांगी पोटे यांच्या हस्ते झाले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य राजाराम बाणखेले, शेतकरी संघटनेचे प्रभाकर बांगर, सेंट्रल बँकेचे शाखा प्रमुख राजेश देशमुख, राणा प्रताप संस्थेचे संस्थापक भास्कर सावंत, उपाध्यक्ष भाऊ निघोट, सचिव अण्णा कोंडे, मैत्री हेल्थकेअरचे अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर, उपाध्यक्ष इरफान पठाण, सचिव प्रिया पोखरकर, अरुण बाणखेले, स्वप्ना खामकर, गणेश खानदेशे, बाबाजी खानदेशे,जागृती महाजन, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. रक्तदान शिबिरात ४८४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांतर्फे एक भेटवस्तू देण्यात आली.
रक्तदान शिबिराचे नियोजन तुषार बाणखेले, योगेश बोऱ्हाडे, महेश माशेरे,सुजय धरम, संदीप सावंत, प्रितेश गांधी, संतोष माशेरे, राज पोखरकर, आनंद खेडकर, राहुल जुन्नरे, राहुल वाबळे, रवी इंगोले, कुणाल बाणखेले,गौरी सुभान शेख, कोमल देशमुख, कावेरी कस्तुरे,शिवप्रसाद गोसावी,वीणा पोखरकर,जनसंपर्क अधिकारी मीनल मोढवे, सतिश कडूसकर, स्वप्नील पोखरकर यांनी केले, अशी माहिती राणा प्रताप संस्थेचे विशाल मोरडे व संग्राम सावंत यांनी दिली.