पुणे जिल्हा : प्रतिकूलतेवर मात करणारे उद्योजक हरिष येवले व दादा वाजे

शिक्रापूर : सध्या अनेकजण नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात उतरुन आपले अस्तित्व निर्माण करत असताना शिरुर तालुक्यातील हरिष येवले पाटील व योगेश उर्फ दादा वाजे या दोन तरुणांनी वेगवेगळ्या व्यवसायात आपले नाव निर्माण करुन समाजाला एक आदर्श निर्माण करुन देत युवकांना प्रेरणा निर्माण करुन दिली आहे.
शिक्रापूरसह पुणे जिल्ह्यात सध्या उद्योग क्षेत्रामध्ये वेगवेगळी नावे चर्चिली जात असताना हरिष येवले यांचे कन्सट्रक्शन तर दादा वाजे यांचे हॉटेल व्यवसायात मोठे नाव निर्माण झाले असताना विशेष म्हणजे या दोघा तरुणांनी कोणतीही पार्श्वभूमी नसताना परिस्थितीत हलाकीची असताना तसेच कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना देखील प्रथम कंपनीमध्ये काही काळ नोकरी करुन त्यातून तुटपुंजी रक्कम गोळा करुन आपला व्यवसाय सुरु केला.
आज आपला व्यवसाय राज्यभरात नावारूपाला आणला आहे. अनेक ठिकाणचे दिग्गज व्यक्ती यांना भेटून त्यांच्या चाललेल्या व्यवसायाबाबत माहिती जाणून घेत आहेत. दोघे देखील आपल्याकडे आलेल्या व्यक्तींसह युवकांना व्यवसायाबाबत मार्गदर्शन करुन त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी प्रेरणा देत आहे.
हरिष येवले पाटील व दादा वाजे दोघेही त्यांच्या उत्पन्नांतून काही रक्कम समाजातील वंचित घटकांसाठी खर्ची करीत असल्यामुळे ते सामाईक भान सुद्धा जपले. अनेक समाजपयोगी उपक्रम राबवले असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक आहे. समाजात आदर्श निर्माण करणारे करणारे तसेच युवकांना दिशा व प्रेरणा देणारे उद्योजक म्हणून हरिष येवले पाटील व योगेश उर्फ दादा वाजे यांच्याकडे पाहिले जात आहे.





