चिंबळी – चिंबळी फाटा (ता. खेड) येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी 70% पर्यंत सवलतीत उच्च दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध करून देणार्या भव्य उपक्रमाचा शुभारंभ नुकताच आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आला. हा उपक्रम बाजार समितीचे संचालक अॅड. अनुराग जैद आणि ग्रामपंचायत सदस्या राजश्री जैद यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला आहे. जीआय कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा उपक्रम 31 जुलैपासून सुरू झाला असून तो 10 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये टीव्ही, गिरणी, वॉटर फिल्टर, सायकल, गिझर यांसारख्या घरगुती वस्तूंवर भरघोस सवलत देण्यात येत आहे. यामध्ये 1 लाखाचा टीव्ही फक्त 24 हजार, 46 हजारांचा टीव्ही 12 हजार, गिरणी 3500, वॉटर फिल्टर 4800, सायकल 4200 आणि गिझर 2400 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. या सर्व वस्तूंना 1 वर्षाची वॉरंटी असून उत्कृष्ट दर्जाची खात्री आहे. उपक्रमाचे आयोजन चिंबळीफाटा येथील शांताई पतसंस्थेजवळ करण्यात आले असून, आतापर्यंत शेकडो नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अत्यावश्यक वस्तू कमी दरात उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.