Pune District : जास्तीत जात पीक कर्ज वाटपाचे प्रयत्न

चिंबळी : गेल्या पंधरा वर्षांपासून मी जनतेची सेवा करीत असून या पुढील काळात ही जनतेची सेवा करणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतक-यांनी दरवर्षी पीक कर्जाचे वाटप केले आहे. यापुढी ही जास्तीत जास्त पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे प्रतिपादन माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केले.
मरकळ येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचे स्थलांतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी मोहिते पाटील बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, माजी सदस्य शांताराम सोनवणे, माजी सभापती विलास कातोरे, कैलास लिंभोरे, माजी सरपंच राजाराम लोखंडे, तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, बाजार समितीच्या संचालिका कमल कड, वामन भुसे, संतोष भुसे, पप्पू लोखंडे, युवा उद्योजोक भरत कड, साखरचंद लोखंडे, अमृता जाधव-कातोरे, प्रवीण चव्हाण, जीवन जैद यांच्यासह सर्व संचालक, आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.





