Pune District : इंद्रायणी नदी घाटावर ड्रेनेज गळती

परिसर अस्वच्छ : भक्त पुंडलिक मंदिरात अस्वच्छ पाणी
आळंदी – शहरातील इंद्रायणी घाटावर नव्याने ड्रेनेज लाइन झाली असून सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी लीकेज असून त्या परिसरातील इंद्रायणी घाटावर त्यातील घाण पाणी इंद्रायणी घाटावर पसरत आहे. तसेच नदीमध्ये तर काही ठिकाणी भक्त पुंडलिंक मंदिरात जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नवीन लोखंडी तयार करण्यात आलेल्या पुलाजवळ तर मोठ्या प्रमाणात गळती लागली असून मोठ्या प्रमाणात तेथून पाणी वाहत आहे.ते घाण पाणी तेथील घाट परिसरात पसरून नदीत जात होते. त्या घाण पाण्यातून नागरिकांना रहदारी करणे कठीण होते.तसेच एका चेंबर जवळील फरशी घालून घाण पाणी येत होते.
तसेच तेथील आजूबाजूच्या परिसरातून सुद्धा घाण पाणी येऊन ते भक्त पुंडलिक मंदिरात जात होते. यामुळे नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने या ठिकाणी योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.
नव्यानेच झालेल्या ड्रेनेज लाइनला गळती लागल्याने संबंधित ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी यांनी व्यवस्थित नियोजन पूर्वक कार्य केले का याची तपासणी करावी, अशी मागणी जोर धरीत आहे.





