पुणे जिल्हा : आयुष्याला घडविणाणार्या शाळेला विसरू नका -डॉ. श्रीपाल सबनीस

लोणी धामणी : आई-वडिलांनंतर शालेय जीवनात बारा वर्षे शाळेतील शिक्षक, आपले मित्र संस्कार करत असतात. बारावीनंतर प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात जातात. त्यामुळे शाळेचा निरोप घेताना एका डोळ्यात अश्रू आणि दुसर्या डोळ्यात आनंद असतो. हा दिवस आयुष्यात परत कधीच येणार नाही. मात्र भविष्यात स्थिर स्थावर झाल्यावर ज्या शाळेने, शिक्षक, मित्रांनी आयुष्याला चांगल्या वळणावर नेऊन ठेवले आहे. अश्या शाळेला, शिक्षकांना व मित्रांना कधीच विसरू नका, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे 89वे अध्यक्ष ज्येष्ठ साहत्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
धामणी (ता. आंबेगाव) येथील श्री शिवाजी विद्यालय व ज्यूनी कॉलेजच्या बारावी निरोप सभारंभ व शुभचिंतन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नुकतीच विक्री कर निरीक्षक पदी निवड झालेल्या विद्यालयाचा विद्यार्थी वैभव भूमकर यांचा सत्कार करण्यात आला.
माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी चे अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे, खरेदी विक्री सांघाचे माजी अध्यक्ष भगवान वाघ, विद्यार्थी सहिल देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. बारावीच्या विद्यार्थांनी शाळेला खुर्च्या भेट दिल्या
या प्रसंगी सरपंच रेश्मा बोर्हाडे, कवयित्री ललिता सबनीस, माजी सरपंच सागर जाधव, उपसरपंच संतोष करंजखेले, ग्रा. पं. सदस्य अक्षय विधाटे, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन जाधव, अमोल जाधव, शब्बीर इनामदार, महेश कदम, शांताराम जाधव, सुहास रोडे, अजित बोर्हाडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डी. आर. गायकवाड, सूत्रसंचालन एस. एल कोकाटे यांनी व आभार स्कूल कमिटी सदस्य वसंत जाधव यांनी मानले





