पुणे जिल्हा : वारकऱ्यांना फराळ वाटप

शिक्रापुरात अनोख्या सेवेने वारकरी सुखावले
शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरुर) येथून आळंदी येथे जाणाऱ्या वारकऱ्यांना शिक्रापूरकरांनी सेवा देत फराळ वाटप करत सेवा दिल्याने वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. शिक्रापूरकरांच्या सेवेने वारकरी सुखावले आहे.
शिक्रापूर येथे वारकऱ्यांच्या सेवेसाठी माऊली सेवा मंडळ शिक्रापूर व शिक्रापूर समस्या उपाय ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांना खिचडी, केळी, चहा, पाणी वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम राबवण्यासाठी उद्योजक रवींद्र चौरसिया, जयंत विरोळे, संतोष चौरसिया, कांतीलाल भुजबळ, गुरुदास चंद्रावळे, शेखर दरवडे,
अंकुश घारे, दत्ता कवाद, किरण चौरसिया, सतीश सासवडे, स्वप्नील मांढरे, अंकुश घारे, तुषार आळंदीकर, भगवान थोरवे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, एसटी स्थानकाच्या वतीने वारकऱ्यांसाठी स्वतंत्र लेन बनवून ओळीने वारकऱ्यांना एसटीमध्ये बसवून देत आळंदीकडे रवाना करण्यात आले. मात्र, यावेळी शिक्रापूरकरांनी सकाळपासून खिचडी, केळी, चहा, पाणी वाटप केले. वारकऱ्यांनी नागरिकांचे आभार मानले.





