पुणे जिल्हा : जगताप प्रतिष्ठानतर्फे वंचितांना फराळ वाटप
Updated On:

सासवड – सध्या दीपावली सण सर्वत्र मोठया उत्साहात साजरा करण्यात येत आहे. समाजातील वंचित घटकांना दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्याचे काम सासवड येथील स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आले.
दीपावली हा सण साजरा होत असताना समाजातील काही कुटुंबात हा सण साजरा करण्याची ऐपत नाही, अशा सुमारे शंभर गरीब व गरजू लोकांना या फराळाचे वाटप करण्यात आल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांनी सांगितले.
याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही दिव्यांग बांधव तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकार बंधूंना देखील दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचे प्रतिष्ठानचे सचिव हेमंत ताकवले यांनी सांगितले. (स्व) एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.





