पुणे जिल्हा : होनेवाडीत शालेय साहित्य वाटप
Updated On:

टाकळी हाजी : होनेवाडी (ता. शिरूर) येथे जिल्हा परिषद शाळेत श्रीमती इंदुमती वसंतलाल शाह. चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली मुंबई यांच्या वतीने शालेय साहित्य देण्यात आले.
ट्रस्टचे माध्यमातून अनेक शाळांमध्ये साहित्य वाटप करण्यात येत असल्याचे रामदास वाजे यांनी सांगितले.
पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, दत्तात्रय बिरामने, एकनाथ निचित, रखमा निचित, विश्वनाथ निचित, रामदास वाजे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी घोडे यांच्या हस्ते साहित्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थ व महिला, विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या शिक्षिका छाया मापारी यांनी आभार मानले.





