Pune District : कुरुळी येथे वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप

चिंबळी – कुरूळी (ता. खेड) येथील श्री विठ्ठल रूख्मिणी सांप्रदायिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जगदगुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आषाढीपायी वारी पालखीबरोबर निघालेल्या वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
दिंडी सोहळ्याचे गेल्या सतरा वर्षांची परंपरा असून बुधवार (दि. १७) रोजी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान दुपारी १२ वाजता पुणे जिल्हा परिषेदेचे माजी सदस्य शांताराम सोनवणे, दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष गुलाब सोनवणे,तसेच सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळी मंदिरात आरती घेऊन विणा पूजन करण्यात आले.
टाळमृदुगांच्या गजरात महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन व खाद्यांवर झेंडा घेऊन टाळ मृदूगांच्या जयघोषात गावातून दिंडी मिरवणूक काढली. स्व. सुलोचना सोनवणे यांच्या स्मरणार्थ ह.भ.प. सत्यवान सोनवणे यांच्या वतीने सर्व वारकरी व भाविकांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली. तर पाऊस सुरू असल्याने वारकरी व भाविकाच्या आरोग्याच्या दृष्टीने माजी उपसरपंच व माजी चेअरमन आशिष मुऱ्हे यांच्या वतीने सर्व भाविकांना रेनकोट वाटप करण्यात आले.





