Pune District : माऊलींच्या मानकर्यांना पान-विडा वाटप

आळंदी – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 17) आळंदी येथे माऊलींच्या मानकर्यांना माऊली मंदिरात पान-विडा वाटपाचा पारंपरिक कार्यक्रम पार पडला.
गुरुवारी (दि. 19) होणार्या पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी मानकर्यांना पान, विडा आणि नारळ देण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून पाळली जाते.
गेली 13 वर्षे श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होत आहे. यंदाही त्यांनी मानकर्यांना पान-विडा वाटप करून माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या सुखद प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बैलजोडी मानकरी विवेक घुंडरे, ऋषिकेश घुंडरे, चोपदार राजाभाऊ रंधवे, सुनील चौधरी, राजाभाऊ चौधरी गुरुजी, बल्लाळेश्वर वाघमारे, पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे, अमोल गांधी, पालखी सोहळा मालक बाळासाहेब अरफळकर, योगेश आरु, मोझे यांच्यासह अनेक मानकरी उपस्थित होते.





