पुणे जिल्हा : भेंडीवर रोगराईचा प्रादुर्भाव

लहरी वातावरणाचा फटका : उत्पादन घटणार
चिंबळी – कमी खर्चात व थोड्या अवधीत जास्त उत्पादन निघणार्या भेंडी पिकाची टोकण पद्धतीने लागवड केली; परंतु अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण तसेच दाट धुके पडले असल्यामुळे पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घटणार असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
चिंबळी (ता. खेड) येथील प्रगतिशील शेतकरी जयसिंग लक्ष्मण बहिरट यांनी गेल्या दीड महिन्यापूर्वी 10 गुंठ्यात 3 हजार रुपये खर्च करून टोकण पद्धतीने भेंडी पिकाची लागवड करून योग्य पद्धतीने खत,
पाणी घालून औषध फवारणी व खुरापणी करून चांगल्या प्रकारे निघा राखून जास्तीत जास्त उत्पादन मिळेल अशी आशा व्यक्त केली होती; परंतु गेल्या 15 दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली
तर ढगाळ वातावरण निर्माण होऊन धुके पडले असल्याने भेंडी पिकावर काळसर रंगाच्या किडी रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने उत्पादन घटणार असल्याचे बहिरट यांनी सांगितले.





