Pune District : डिंभे गावात रंगला दिंडी सोहळा

मंचर – डिंभे ता.आंबेगाव येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयाच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन करून विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा केल्या. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी वारीचा आनंद घेतला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील वळसे पाटील,दत्तमंदिराचे पुजारी यांच्या हस्ते प्रथम आद्य ग्रंथ ज्ञानेश्वरीचे आणि श्री विठ्ठल रुकमीणीच्या मूर्तीची पूजा करण्यात आली.त्यानंतर डिंभे येथील दत्त मंदिरापासून पालखी सोहळा विद्यालयाकडे मार्गस्थ झाली. विद्यार्थीनीनी भजन,ओव्यामधून श्री विठ्ठलाची आराधना केली.तसेच फूगड्या खेळून फेर धरून वारीचा आनंद लुटला.
वारी सोहळ्याचे नियोजन विद्यालयातील शिक्षक संजीव पिंगळे,रामकृष्ण राजगुरु,तुकाराम देवडे,राजेंद्र हुले, दत्तात्रय मंचरकर,मनीषा आढळराव,वंदना मंडलिक, संतोष जधर,बाळासाहेब विधाटे,निलेश भालेराव, बाळासाहेब टाव्हरे,शशिकांत भवारी, दौलत राक्षे इत्यादींनी केले.





