पुणे जिल्हा : शिरोली गावात हुकूमशाही पद्धत – भगवानराव वैराट

पुणे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारि अधिकार्यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.
आळंदी – शिरोली गाव (ता. खेड) येथील भटक्या विमुक्त जाती जमातीतील विधवा महिला साखराबाई मारुती विटकर या महिलेचे गेल्या 30 ते 35 वर्षांपासून शिरोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत आणि घरापासून थोड्याच अंतरावर स्टॉल लावून व्यवसाय करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. दरम्यान, गावातील काही राजकीय पुढार्यांनी ग्रामपंचायत येथील अधिकार्यांना, पोलिसांना हाताशी धरत हुकूमशाही पद्धतीने या महिलेचे स्टॉल जेसीबी लावून कारवाई केली.
या घटनेचा जाब विचारण्यासाठी संघर्ष नायक भगवानराव वैराट यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल आणि महाराष्ट्र राज्य पथारी सुरक्षा दलाच्या शिष्टमंडळाने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांना भेटून चर्चा करत संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि या गरीब आणि विधवा महिलेला न्याय द्यावा. तसेच फेरीवाला धोरण 2009 तसेच पथविक्रेता अधिनियम 2014 प्रमाणे त्या महिलेचा बायोमेट्रिक पद्धतीने सर्व्हे करून परवाना द्यावा आणि झालेली नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करून निवेदन देण्यात आले.
निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळातील पदाधिकारी पथारी सुरक्षा दलाचे पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे, पथारी सुरक्षा दलाचे पुणे शहर कार्याध्यक्ष संतोष कदम, झोपडपट्टी सुरक्षा दल पुणे जिल्हा महिला आघाडी कार्याध्यक्षा निलम सोनवणे, झोपडपट्टी सुरक्षा दल पुणे शहर अध्यक्ष सतीश कांबळे, पथारी सुरक्षा दल पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, झोपडपट्टी सुरक्षा दल पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, पुणे शहर झोपडपट्टी सुरक्षा दल महिला आघाडी उपाध्यक्षा दिना शेखर, ज्या महिलेवर अन्याय झाला, त्या साखराबाई मारुती विटकर बैठकीला उपस्थित होते.





