Pune District : देवराई म्हणजे निसर्गाशी आपले नाते दृढ

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ : भाटनिमगावमध्ये फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवराईची निर्मिती
वडपुरी – देवराई म्हणजे निसर्गाशी आपले नाते दृढ करणारा एक श्रद्धास्थान असून शिंदे परिवारांनी केलेली ही केवळ वृक्षांची लागवड नव्हे, तर ती एक सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि आध्यात्मिक परंपरा आहे, असे मत केंद्रीय सहकार व नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दीड एकर क्षेत्रात वृक्ष लागवड करण्यात आली त्यावेळी मोहोळ बोलत होते. यावेळी भाजप नेते प्रवीण माने, जिल्हा महामंत्री आकाश कांबळे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे, ज्येष्ठ नेते,मारूती वनवे, तानाजी थोरात,
माऊली वाघमोडे, राजू जठार, राम आसबे, किरण गानबोटे, रमेश खारतोडे, आबासाहेब थोरात, सतीश पांढरे, रवींद्र सरडे, स्वप्निल सावंत, कैलास कदम, शांतीलाल शिंदे, हनुमंत जाधव, अमोल चंदनशिवे, सुभाष गायकवाड, दिलीप पाटील, अमोल इंगळे आदींसह ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.
भागवत शिंदे ऊर्फ भाऊंचे कुटुंब हे अतिशय गरीब कुटुंब होते. या कुटुंबातील दोन मुले म्हणजेच सुशीलकुमार शिंदे व विजय शिंदे यांना भागवत शिंदे यांनी चांगल्या प्रकारचे शिक्षण शिकवले. दोन्हीही मुलांनी आपापल्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती केली आणि आज त्यांनी आपल्या कुटुंबाला नावलौकिक मिळवून दिले आहे.
– प्रवीण माने, माजी सभापती, जिल्हा परिषद, पुणे





